भोगावती साखर वाद

भोगावती साखर वाद

संशयास्पद साखर वाहतूक करणारा
ट्रक ‘स्वाभिमानी’ने अडविला

राशिवडे बुद्रुक, ता. ३० : भोगावती सहकारी साखर कारखान्यातून पुन्हा संशयास्पद साखर वाहतूक करणारा ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिते येथे अडवला. चुकीच्या मार्गाने साखर विक्री केली जात असून यामुळेच भोगावती कर्जाच्या खाईत गेल्याचा आरोप संघटनेसह सर्व पक्षीय नेत्यांनी केला आहे.
बिल नसल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या मेन गेटवर जाऊन माहिती घेतली असता ट्रकची बाहेर जाण्याची नोंद नसल्याचे निदर्शनास आले.
या बाबत करवीर पोलिसात तक्रार केली. तपासणीसाठी आलेले पोलसि निरीक्षक अरविंद काळे यांनी कारखाना प्रशासन व विरोधकांना एकत्र करून चर्चा केली. मात्र विरोधकांनी हे प्रकरण गंभीर असून, याची सखोल चौकशी करा अन्यथा आंदोलन करू, अशा प्रकारचे निवेदन दिले आहे.
भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, धैर्यशील पाटील पाटील, अशोक पवार, संचालक दत्तात्रय मेडसिंगे, माजी संचालक नामदेव पाटील, विश्वास पाटील, डॉ. जालंदर पाटील, अण्णाप्पा चौगले, रावसाहेब डोंगळे'' सातापा पाटील, रंगराव पाटील उपस्थित होते.


कोट
चोरीने साखर विक्री करण्याचे प्रकार आम्ही अनेकदा उजेडात आणले. मात्र आमच्यावरच अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा प्रकार व धमक्या दिल्या हा म्हणजे स्वराच्या उलट्या बोंबा असे आहे.
-जनार्दन पाटील, जिल्हाध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोट
कारखान्यातून रितसर परवानगीने हा ट्रक बाहेर पडला आहे. कारभार पारदर्शक झाला आहे. याबाबतची कागदपत्रे पोलिसांकडे दिली असून, पुढील निर्णय संचालक मंडळ घेतील.
-संजय पाटील, कार्यकारी संचालक,
भोगावती सहकारी साखर कारखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com