

Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
sakal
-अभिजित कुलकर्णी
नागाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘रोडवे सोल्युशन्स’ ठेकेदार कंपनीचे काम थांबविल्याने महामार्गावरील टोप येथील उड्डाणपुलाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. मुदतवाढ देऊनही वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे प्राधिकरणाने ही कारवाई केली. मात्र, महामार्ग प्राधिकरण आणि मुख्य ठेकेदार कंपनी यांच्यातील अंतर्गत वादाचा आर्थिक फटका उपठेकेदाराला बसला असून, उभारलेले सेंट्रिंग स्ट्रक्चर कट करून काढून घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.