Kolhapur : ४०० फूट खोल दरीच्या काठावर सेल्फी घेत होता, वाऱ्याच्या वेगाने तोल गेला; कोल्हापूरचा पर्यटक कोसळला अन्

Kolhapur Amboli Ghat : कोल्हापूरच्या कुडित्रे येथील गेळे-कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगला टेकून फोटो घेत असताना वाऱ्याच्या वेगामुळे तोल जाऊन कोल्हापूरचा पर्यटक ४०० फूट खोल दरीत कोसळला.
Kolhapur Amboli
Kolhapur Amboliesakal
Updated on

Amboli Selfie Point : कुडित्रे येथील गेळे-कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगला टेकून फोटो घेत असताना वाऱ्याच्या वेगामुळे तोल जाऊन कोल्हापूरचा पर्यटक ४०० फूट खोल दरीत कोसळला. राजेंद्र बाळासाहेब सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे त्यांचे नाव असून, ही घटना आज (ता. २७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. सनगर हे करवीर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत आहेत. घटनास्थळी धुके व काळोख असल्याने उद्या (ता.२८) सकाळी शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com