
Kolhapur 23-Year Old Dies During Practice : भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न. त्यासाठी तो कष्ट घेत होता. रोज पहाटे पळायचा. अभ्यास करायचा. सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याबरोबरच आई-वडिलांच्या नशिबात चांगले दिवस आणण्याचे त्याचे ध्येय होते. मात्र, आज पहाटे सहाच्या सुमारास धावण्याचा सराव करतानाच त्याला हृदयविकाराने गाठले अन् सैन्य भरतीचे त्याचे स्वप्न भंगले. ही दुर्दैवी कहाणी आहे वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील शुभम धनाजी आडावकर (वय २३) याची.