
esakal
Incident in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांत चार जणांचा बुडून मृत्यू झाला. ऐन दिवाळीत या दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. करवीर तालुक्यातील म्हालसवडेत विहिरीत बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर कळंबा तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत वारणानगर येथे ड्रेनेजमध्ये पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.