

कोल्हापूरजवळील प्रयाग चिखली येथे अवघ्या १५ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली.
esakal
Prayag Chikhali Kolhapur news : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील तन्वी अमर पाटील (वय १५) हिने बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने ओढणीने गळफास घेतल्याचे सायंकाळी सातच्या सुमारास दिसून आले. तिच्या भावाने हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. तन्वीचे आई, वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तन्वी इयत्ता दहावीत शिकत होती.