
कोल्हापूर : पोलिस ठाण्याकडे पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या अंमलदारांना बदलीची प्रतीक्षा होती. मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना पोलिस अधीक्षकांच्या बदलीमुळे याला जून महिना उजाडला. ३१ मे रोजी रात्री झालेल्या आदेशानुसार सात श्रेणी फौजदार, ३२ सहायक फौजदारांसह ३४५ जणांची बदली करण्यात आली. तर ५९ जणांना मुदतवाढ देण्यात आली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशाने बदल्या करण्यात आल्या.