esakal | सीट बेल्ट न लावण्याची बनतेय फॅशन पण
sakal

बोलून बातमी शोधा

Transport Branch action on more than two thousand  people not to wear a seat belt

वाहतूक शाखेची दोन हजारांहून अधिकांवर कारवाई; वाहनाचा विमा नसणाऱ्यांवरही कारवाई

सीट बेल्ट न लावण्याची बनतेय फॅशन पण

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : वाहन चालविताना सीट बेल्ट न लावण्याची फॅशनच बनते आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आठ महिन्यांत केलेल्या कारवाईतून त्याचे वास्तव समोर येत आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. 

सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी शहर वाहतूक शाखेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रबोधनासह कारवाई अशा दोन वेगवेगळ्या माध्यमातून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सीट बेल्टचा वापर करावा, याबाबत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर कारवाईस सुरवात केली होती. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वाहनांचीही संख्या कमी झाली. लॉकडाउनमध्ये शिथिलता लागू झाली तशी वाहनांची संख्या वाढली. साहजिकच शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम पुन्हा हाती घेतली. 

हेही वाचा- तरुणांनो सावधान : काही  मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -


शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या दोन हजारांहून अधिक जणांवर कारवाई केली. क्षमतेपेक्षा वाहनांत जास्त प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अतिरिक्त प्रवाशांमुळे वाहन चालविताना अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताचे धोके वाढतात. हे धोके टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. त्याचबरोबर वाहनांसंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यात वाहनांचा विमा नसणारी वाहनेही कारवाईच्या कात्रीत अडकत आहेत. 

जानेवारी ते ऑगस्ट कारवाई अशी :
प्रकार    कारवाई    दंड वसूल    अनपेड दंड
सीट बेल्ट न लावणे    २०६८    ४,१३,६००    १,८३,८००
विमो नसलेले वाहन चालवणे    ३४    २८,९००    १५,४००
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे    १०८    २१,६००    ७,२००

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top