`गो ग्रीन` योजनेला `डिसलाईक`

The Trend Towards Printed Electricity Bills In Ichalkaranji Kolhapur Marathi News
The Trend Towards Printed Electricity Bills In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : महावितरणच्या गो ग्रीन योजनेला लाखावर वीज ग्राहकांनी नापसंती दाखवली आहे. इचलकरंजी विभागातील 1 लाख 17 हजार ग्राहकांपैकी केवळ 521 जणच गो ग्रीनसाठी पुढे आले आहेत. छापील वीज बिलाची मागणी टाळून वीज बिलासाठी ईमेल अथवा एसएमएसचा पर्याय असणाऱ्या गो ग्रीन या पर्यावरणपूरक योजनेचा इचलकरंजीवर अजिबात प्रभाव पडलेला दिसत नाही. 

इचलकरंजी महावितरण विभागांतर्गत तीन उपविभाग येतात. यामध्ये शहरासह आसपासचा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व यंत्रमाग, कृषी अशी एकूण 1 लाख 17 हजार 280 वीज ग्राहक या परिक्षेत्रात येतात. कागदाचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनासाठी महावितरणने अंमलात आणलेल्या गो ग्रीन योजनेला वीज ग्राहकांनी खो घातला आहे. एका वर्षात गो ग्रीनसाठी लाखो ग्राहकांपैकी फक्त 521 वीज ग्राहकांनीच पुढाकार घेतला आहे. 

गो-ग्रीन योजनेत छापील वीज बिलाऐवजी ईमेलचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रति बिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची बचत होते. शिवाय वीज बिल ईमेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा मिळणार असल्याने ते त्वरित प्रॉम्प्ट प्रेमेंटसह ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे.

आतापर्यंत राज्यातील 2 लाखांवर ग्राहकांनी या योजनेची कास धरली आहे. वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी स्वरूपात जतन करण्याची सोय करण्यात आली आहे. 

वीज ग्राहकांनी गो ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी वीज बिलावरील गो ग्रीन क्रमांक अथवा क्‍यूआर कोड स्कॅन करून याची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ऍपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या गो ग्रीन लिंकवर उपलब्ध आहे. वीज ग्राहकांनी महावितरणच्या गो ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे, असे आवाहन महावितरणकडून केले आहे. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com