fatal jeep accident in sangli maharashtra
esakal
घुणकी : वाठार-वारणानगर मार्गावरील वाठारजवळ भरधाव जीपने धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील बालक जागीच (Child Death Road Accident) ठार झाले. तर त्याच्या आई -वडिलांसाह सहा जण गंभीर जखमी झाले. धैर्यशील उदय जाधव (वय ५ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.