
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरण सुरू असलेल्या कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. आता पुन्हा या मार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ पसरली आहे.