

सरकारकडून उद्योजकांच्या अपेक्षा
अमेरिकेसोबतच्या या ‘ट्रेडडिल’वर केंद्र सरकारने लवकर तोडगा काढावा
सकारात्मक तोडगा निघेपर्यंत सरकारने निर्यात प्रोत्साहन अनुदान वाढवावे
मिडल ईस्ट, आफ्रिका, आदी देशांसारख्या नव्या बाजारपेठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत
उद्योगांतील उत्पादन विविधता वाढवणे, स्थानिक सहाय आणि मार्केटिंग क्लस्टर्स मजबुतीला पाठबळ द्यावे
Kolhapur Economy : संतोष मिठारी : भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे कोल्हापूरचीही निर्यात घटणार आहे. त्यावर आपल्या उद्योगांचे चक्र सुरू ठेवण्यासाठी इथल्या उद्योजकांनी पर्यायांचा विचार सुरू केला आहे. या शुल्क वाढीवर केंद्र सरकारच्या कार्यवाहीतून सकारात्मक तोडगा निघाला तर ठीक, अन्यथा नवी बाजारपेठ शोधण्याची तयारी ते करणार आहेत.