Tushar Prabhakar Patil death news
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे तत्कालीन पोलिस उपाधीक्षक व राज्य राखीव बल गट क्रमांक ५ दौंडचे समादेशक अपर पोलिस अधीक्षक तुषार प्रभाकर पाटील (वय ४५) यांचे (Former Kolhapur DySP passes away) काल (ता.७) पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (ता. ८) जामनेर (जि. जळगाव) या त्यांच्या मूळ गावी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.