
आजरा : सव्वा महिन्याहून अधिक काळ घाटकरवाडी (ता. आजरा) परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टस्कराला हुसकावण्यासाठी वनविभागाने ड्रोनच्या मदतीने मोहीम राबविली होती. आजऱ्यात ड्रोनचे पथकही चार दिवस मुक्काम ठोकून होते; पण टस्कराने त्यांना दाद दिली नाही. तो आजही घाटकरवाडीत मुक्काम ठोकून आहे. त्याच्याकडून पिकांचे नुकसान होत आहे.