

मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळ दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडण्यात आली आहेत.
esakal
Heritage Destruction : मालवण येथील राजकोट किल्ल्याजवळ सुमारे दोन शतकांपूर्वी बांधलेल्या ब्रिटिशकालीन दोन स्मारकांची अनोळखींकडून तोडफोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या स्मारकांमध्ये बसवण्यात आलेल्या संगमरवरी पाट्या गायब झाल्या आहेत. या प्रकारामुळे इतिहासप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक ठेव्याच्या दुरवस्थेमुळे इतिहासप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.