
कोल्हापूर : दूरसंचार विभागाच्या कार्यालयांना लक्ष्य करून बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांसह खरेदीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दत्ता बाळू गावडे (वय ३२, रा. गोंदिरा, आटपाडी, जि. सांगली), प्रीतेश गिरीश पुजारी (३५, गुजरवाडी, कात्रज, पुणे) व साकीब साबीर मलीक (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. तिघांकडून चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून, एक लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.