
इचलकरंजी : शहापूरमधील एका हायस्कूल परिसरात असलेल्या पानपट्टीत दोनवेळा सिगारेट खरेदी करताना प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार या दोघांनी २०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्याचा प्रकार घडला. या प्रकरणातील पसार संशयित अर्जुन दळवी (रा. विकली मार्केटजवळ) आणि ओंकार साळुंखे (रा. इचलकरंजी) या दोघांना पोलिसांनी साळुंखे याच्या राहत्या घरातून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता , न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.