
गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार हातात घेऊन त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल विवेक ऊर्फ क्रॅक बाब्या शिवाजी घुरे (वय २०, रा. साधना हायस्कूलजवळ गडहिंग्लज) व अजित मारुती चोथे (२७, रा. लिंगनूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.