

दौलत-अथर्व साखर कारखान्याच्या कामगार वादातून हलकर्णी येथे तणाव निर्माण झाला. या वादात दोघांना बेदम मारहाण
esakal
Kolhapur Chandgad Sugar Factory : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याकडील कामगारांच्या प्रश्नासंदर्भात कामगार संघटना व अथर्व प्रशासनाच्या बैठकीनंतर आज दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष बाळाराम फडके यांच्या मोटारीवर अनोळखींनी दगडफेक केली. यावेळी फडके मोटार चालवत होते. त्यांच्या शेजारी बसलेले दौलत सभासद संघटनेचे प्रा. विजयभाई पाटील यांच्या जबड्याला दगड लागून ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी फडके यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला; पण दरवाजे लॉक असल्यामुळे ते बचावले.