कोल्हापूर : दोन लिपिक, एक शिपाई; ‘सारथी’ उपकेंद्राची अवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : दोन लिपिक, एक शिपाई; ‘सारथी’ उपकेंद्राची अवस्था

कोल्हापूर : दोन लिपिक, एक शिपाई; ‘सारथी’ उपकेंद्राची अवस्था

कोल्हापूर : दोन लिपिक व एक शिपाई अशी छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्थेच्या (sarathi) उपकेंद्राची अवस्था आहे. सहा महिन्यांत १६७ जणांनी संस्थेला भेट देऊन योजनांची माहिती घेतली असून, उपकेंद्राचा कारभार संथ गतीने सुरू आहे. उपकेंद्राच्या ताब्यात केवळ इमारत मिळाली असली तरी पाच एकर जागेचा प्रश्न रेंगाळला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून, त्यावर गतीने कार्यवाही झालेली दिसत नाही.

हेही वाचा: बाळाच हृदय तंदुरुस्त झालं, घर आनंदान डोलू लागलं; पाहा व्हिडिओ

मराठा समाजाला बळ देण्यासाठी सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले. जिल्ह्यातील खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती(mp sambhajiraje chatrpati) यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व मराठा समाजाच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. पालकमंत्री सतेज पाटील(satej patil) यांनी उपकेंद्रासाठी राजाराम महाविद्यालयातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या परिसरातील कमवा व शिका योजनेची इमारत मिळवून तत्परतेने तिची रंगरंगोटी करवून घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू जयंतीला उपकेंद्राचे ऑनलाईन उद्‍घाटन झाले. त्यानंतरच्या काळात दोन लिपिक व एक शिपाई नियुक्त करून उपकेंद्राचे काम सुरू झाले. दररोज एक-दोन कार्यकर्ते, विद्यार्थी उपकेंद्रास भेट देऊन माहिती घेत राहिले. या आकड्याने अद्याप २०० चा टप्पा गाठलेला नाही.

हेही वाचा: आलिशान कार चोरणारी टोळी कोल्हापुरात जेरबंद ; कर्नाटकातील तिघे अटक

उपकेंद्रासाठी पाच एकर जागा देण्याची घोषणा झाली होती. त्याचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला असला तरी त्याबाबत कोणतीच हालचाल नाही.उपकेंद्राकडे जाणारा रस्ता अल्पसंख्याक वसतिगृहा लगतच्या परिसरातून करण्याचे नियोजित होते. त्यामुळे ते रखडले आहे. राजाराम महाविद्यालयाच्या उच्च प्रवेशद्वारातून शिक्षण सहसंचालक कार्यालयामार्गे सारथीच्या उपकेंद्राकडे जावे लागत आहे. सारथीतर्फे विविध योजना जाहीर होत असताना उपकेंद्राला बळकटी येणे आवश्यक आहे. उपकेंद्रासाठी सुमारे ५० जणांच्या मनुष्यबळासह अन्य सुविधा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. उद्‍घाटनानंतर तीच प्रक्रिया मंदावल्याने संस्थेच्या उपकेंद्राच्या भवितव्यासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : जिकडे कोरेंचा पाठिंबा त्यांचाच होणार अध्यक्ष

उपकेंद्रातील मनुष्यबळासाठी प्रस्ताव पाठवला आहे. पाच एकर जागेसाठी प्रस्ताव पाठवला असून, सारथीतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत.

- अशोक पाटील, निबंधक, सारथी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
loading image
go to top