
कोल्हापूर : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करताना विद्यार्थ्यांत पर्यावरणविषयक जाणीव जागृती निर्माण करण्याचा निसर्ग मित्र संस्थेचा फंडा भारी ठरलाय. दिवाळीत ज्या विद्यार्थ्यांनी फटाके वाजवले नाहीत, त्यांना दोन दिवसीय सहल घडवून मूलभूत विज्ञानाचे बीज रोवले जात आहे. गेली 24 वर्षे संस्थेचा हा उपक्रम सुरू आहे.
दिवाळी म्हटले की, लहान मुले-मुली फटाके उडविण्याचा अट्टहास करतात. फटाक्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत जातात. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण त्यांच्या लक्षात येत नाही. प्रदूषणाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो, हे त्यांना कळावे या उद्देशाने निसर्ग मित्रने एक चळवळ सुरू केली. महापालिका, जिल्हा परिषद, खासगी शाळांत जाऊन पर्यावरणाच्या समतोलाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले.
विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली भरून घेतली, ज्या विद्यार्थ्यांनी फटाके उडवले नाहीत, त्यांना दोन दिवसीय सहलीतून जंगल भ्रमंतीचा देण्यास सुरुवात झाली. ज्या गडावर अथवा जंगला नजीकच्या गावात सहल आयोजित केली. त्या गावातील स्थानिक मुला-मुलींचा सहभागही सहलीत करून घेतला. संस्थेने दोन-तीन वर्षे शहरातील मुलांना ग्रामीण जीवन कळावे, यासाठी नामी शक्कल लढवली. स्थानिकांच्या घरात विद्यार्थी व विद्यार्थिनीची राहण्याची सोय केली. त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून त्यांना मार्गदर्शनही केले.
संस्था सहलीसाठी दोन बॅचचे नियोजन करत आहे. ग्रामीण भागातील शाळेत या उपक्रमाची माहिती दिली आहे. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थीही सहलीत सहभाग घेत आहे. ज्या गावात अथवा गड-किल्ल्यावर सहल आहे. तिथल्या येण्या-जाण्याचा खर्च विद्यार्थ्यांवर सोपवला जातो.
मुख्यमंत्र्यांकडूनही जागर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.सकाळनेही प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी भूमिका घेतली. त्याभूमिकेला एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पाठबळ देत प्रदुषणमुक्तीचा जागर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी आणणे शक्य होते. मात्र, आता ही वेळ निघून गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाज भान राखत फटाके उडवू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
या उपक्रमाला 24 वर्षे झाली आहेत. सार्वजनिक वाहनातून सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचा पर्यावरण विषयक पाया पक्का व्हावा, हा उपक्रमामागील उद्देश आहे. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.
- अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र.
आमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा हा उपक्रम होता. पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. अन्यथा पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास वेळ लागणार नाही.
- आदित्य पोवार, मंगेशकरनगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.