धक्कादायक ; दारू पिल्याने झाला दाघांचा मृत्यू 

two died due to drinking alcohol in belgaum
two died due to drinking alcohol in belgaum
Updated on

बेळगाव : लॉकडाउन काळात मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असतानाच बेळगाव तालुक्‍यात अती मद्यप्राशनाने दोघा मद्यपींचा मृत्यू झाला आहे. सोमवार (ता.11) एकाच दिवशी या दोन्ही घटना घडल्या असून या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात दोन स्वंतत्र प्रकरणांची नोंद झाली आहे. 

क्रांतीगौडा गंगाधर गुत्ती (वय 31, रा. सुळधाळ) आणि विजय यल्लाप्पा पुजेरी (वय 35, रा. मल्लापुर एसए ता. गोकाक) अशी मयतांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, क्रांतीगौडा याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो फिरत फिरत हुदली गावाला पोहचला. 8 एप्रील ते 11 मेच्या दरम्यान हुदली येथील शिवनगौडा कल्लाप्पा पडगुरी यांच्या उसाच्या शेतीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यू मद्यप्राशनाने झाला असून दुसरा कोणताही संशय नसल्याचे पोलिसांनी नोंद करुन घेतली आहे. तर विजयला देखील दारुचे व्यसन होते. व्यसन सोडण्यासाठी कुटुंबीयानी अनेकवेळा सांगून देखील त्याने दारु सोडली नाही. काल सकाळी 6 ते दुपारी 2 च्या दरम्यान दारुच्या नशेत हारनकोळ्ळ गावातील फकिरप्पा बसवणी उदगट्टी यांच्या जमिनीत पडून त्याचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची नोंद मारिहाळ पोलिसात झाली पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com