ब्रेकिंग - बेळगावात दिवसभरात कोरोनाबाधितांचे द्विशतक 

two hundred new corona positive case found in belgaum
two hundred new corona positive case found in belgaum
Updated on

बेळगाव - कोरोनाबाधितांच्या आकड्याने बुधवारी (ता. 22) उच्चांक गाठला. एकाच दिवसात सर्वाधिक 219 कोरोनाबाधित आढळले. यापूर्वी 18 जुलैला 137 आणि 17 जुलैला 95 रुग्ण आढळले होते. दरम्यान, त्यामध्ये बेळगाव तालुक्‍यातील तब्बल 66 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 315 झाली आहे. 

आरोग्य विभागातर्फे 24 तासात मृत्यू नोंद नाही. परंतु, खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौघे कोरोनाचे बळी ठरले आहेत. त्यात अथणी दोन, विजापूरमधील एक आणि सिध्दीकुरबेट यथील एकाचा मृत्यू झाला आहे. 

जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात वाढलेल्या कोरोनाच्या आकड्याने एक हजाराचा टप्पा गाठला होता. पंरतु, आज अचानक दोनेशे रुग्णांची भर पडल्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्याने 1,315 वर पोहोचली आहे. तर 830 जण उपचार घेत असून, त्यापैकी 9 जण अतिदक्षता विभागात आहेत. 

 बेळगाव शहरात चव्हाट गल्ली आणि विजयनगरसह तालुक्‍यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. यामुळे बेळगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. बाधितांमध्ये सर्वाधिक बेळगाव तालुक्‍यात 67 आणि अथणीमध्ये 79 जणांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ चिक्कोडी, रायबाग, सौदत्ती, खानापूर, गोकाक व हुक्केरी आदी तालुक्‍यामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन 219 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. 

 
चव्हाट गल्ली परिसर सील
 
चव्हाट गल्लीसह शहरातील विविध प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे परिसर सील केला आहे. तसेच संशयित आणि त्यांच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय शहरातील विविध परिसरात बाधीत आढळल्यामुळे अनेक भागामध्ये बॅरिकेड्‌स घालून परिसर सील केला आहे. त्यामुळे बेळगाव तालुका हॉटस्पॉट बनला असून, आरोग्य विभाग संसर्ग नियंत्रणासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com