
Kolhapur Killing Case : कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल(ता.०७) एका दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये खून झाले आहेत. गांधीनगर येथे किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याने खून करण्यात आला तर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे मारहाणीचा बदला घेण्यासाठी धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला.