

Uchgaon Announces 50% Tax Relief
sakal
उचगाव : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत समृध्द पंचायत राज्य अभियान योजनेनुसार ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी सवलत जाहीर केली. मिळकत धारकांना घरफाळा व पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. गावात विविध योजना राबविल्या आहेत, अशी माहिती सरपंच मधुकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.