उजळाईवाडी : पोलीस कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ

पाच ठिकाणी घरफोडी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
चोरट्यांचा धुमाकूळ
चोरट्यांचा धुमाकूळ sakal

उजळाईवाडी : उजळाईवाडी येथील पसरिचा नगर पोलिस कॉलनी व उजळाई कॉलनी मध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. उजळाईवाडी येथील पसरिचानगर मध्ये राहणारे रावसाहेब जीवा पाटील (वय ७३) यांच्या घरी मंगळवार (ता २८ रात्री दहा ते बुधवार (ता. २९) च्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्टोअर रूम मधील कुलूप तोडून मुलाच्या बागेतील रोख २० ६७० रुपये लंपास केले. याबाबतची फिर्याद रावसाहेब पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खोत करीत आहेत. तसेच शेजारीच असणार्‍या विजय कासार व राजू दलाल यांच्या घरामध्ये कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चोरट्यांचा धुमाकूळ
शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील रियाज शौकत शेख (रा.उजळाई कॉलनी, सरनोबतवाडी) यांच्या घरामधून ८० हजार रोख व ४५ हजारांचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गांधीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरटे सीसीटीव्ही कैद

सदर चोरटे शेजारी देशपांडे यांच्या घरांमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा प्रयत्न करीत असतानाच्या हलचाली कैद झालेल्या आहेत. यामध्ये चोरट्यांचा चेहरा स्पष्ट दिसत असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस कॉलनीच असुरक्षित

पोलिसांची कॉलनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पसरिचा नगरमध्येच चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे चोरट्यांच्या या धाडसाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परिसरामध्ये वारंवार घरफोड्या, वाटमारी होत असल्यामुळे स्थानिकांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे. पसरिचा नगर कमानी पासून संपूर्ण कॉलनीमध्ये कोठेही लाईट नसल्यामुळे चोरट्यांना या भागात चोरी करणे सहज सोपे बनले आहे. वारंवार अर्ज ,विनंत्या, तक्रारी करूनही संबंधित ग्रामपंचायत व महावितरण अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com