

Umesh Ganesh Pathroot Death Leaves Children Without Support Family Members Ask How Will the Young Children Survive
sakal
कोल्हापूर: रविवारी रात्री जेवायला बाहेर गेलेले उमेश व गणेश पाथरूट यांचा अपघात होऊन त्यात त्यांचा बळी गेला. आज सकाळी त्यांचे मृतदेह घरी आल्यावर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडून आक्रोश केला. यामुळे उपस्थितांनाही गलबलून येत संपूर्ण सायबर चौैकावर शोककळा पसरली. ‘आता आमच्या कुटुंबाचा आधार कोण, या चिमुकल्यांचे कसे होणार?’ अशा शब्दांत नातेवाइकांनी आपला संताप आणि हतबलता व्यक्त केली.