मोठी बातमी! किल्ले पावनगडावरील अनधिकृत मदरसा पोलिसांकडून जमीनदोस्त; हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कारवाई

किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेला मदरसा (Madrasa) प्रशासनानं आज जमीनदोस्त केला.
Pawangad Fort Madrasa
Pawangad Fort Madrasaesakal
Summary

मध्यंतरीच्या कार्यकाळात हा मदरसा बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान, हिंदुत्वादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं याबाबतची खातर जमा करत आज त्यावर कारवाई केली.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेला मदरसा (Madrasa) प्रशासनानं आज जमीनदोस्त केला. हिंदुत्ववादी संघटनेच्या (Hindu Organization) आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) आणि प्रशासन यांनी कमालीची गुप्तता पाळत हा अनधिकृत मदरसा रात्रीत जमीनदोस्त केला आहे.

मध्यरात्री दोन वाजता सुरू झालेली कारवाई आज सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, किल्ले पावनगडाकडे जाणारी सर्वच रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. 1979 पासून पावनगडावर अनधिकृत मदरसा असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिली होती.

Pawangad Fort Madrasa
'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

मध्यंतरीच्या कार्यकाळात हा मदरसा बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान, हिंदुत्वादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं याबाबतची खातर जमा करत आज त्यावर कारवाई केली. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधून काही मुस्लिम तरुण या ठिकाणी सततचे ये-जा करत असल्याची माहिती देण्यात आली होती. किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यासाठी प्रशासनानं कमालीची गुप्तता पाळली होती. काल सायंकाळपासूनच या सर्व घडामोडीला वेग आला होता. किल्ल्यावर जाणाऱ्या सर्वच वाटा पोलिसांनी बंद केल्या होत्या.

Pawangad Fort Madrasa
सुजित मिणचेकर, सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचे कान भरले आणि मला पदावरून हटवलं; माजी जिल्हाप्रमुखांचा गंभीर आरोप

त्यापूर्वी मदरशातील काही मुलांना त्यांच्या गावी वाहनाची व्यवस्था करून पाठवण्यात आलं होतं. जिल्हा पोलीस प्रमुखांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा किल्ले पावनगडावर रात्रीपासून मुक्काम ठोकला होता. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळत आज सकाळी कारवाई पूर्ण केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं या महिनाभरात दुसरी कारवाई करत किल्ले पावनगडावरील मदरसा जमीनदोस्त केला आहे.

Pawangad Fort Madrasa
Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com