

Satara inspector accused
sakal
कोल्हापूर: सातारा जिल्ह्यातील वैध मापनशास्त्र कार्यालयातील योगेश अग्रवाल नावाच्या निरीक्षकाला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासण्याचे कोणतेही आदेश नसतानाही, त्यांनी जिल्ह्यातील तीन कारखान्यांचे वजनकाटे तपासून ते प्रमाणानुसार योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. या प्रकाराबाबत सहायक निरीक्षक अग्रवाल यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त संजय कोलते यांनी आज दिले.