esakal | आडाळी एमआयडीसीची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

आडाळी एमआयडीसीची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून पाहणी

आडाळी एमआयडीसीची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळणे : आडाळी एमआयडीसीला आज केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय वनौषधी संस्थेला देण्यात आलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पतून शेकडो जणांना रोजगार मिळेल. येथील जैवविविधतेला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाईक केंद्रीय आयुष मंत्री असताना त्यांनी राज्यासाठी एकमेव असलेला राष्ट्रीय वनौषधी संस्था हा प्रकल्प मंजूर केला. सुरवातीला हा प्रकल्प जळगाव व नंतर लातूर येथे हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र जिल्ह्यातील शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी समन्वय साधून अखेर जिल्ह्यात प्रकल्प आणला. गेल्या जून मध्ये राज्य शासनाने आडाळी एमआयडीसी तील पन्नास एकर जागा या प्रकल्पला दिली. महामंडळाने तातडीने या जागेचे हस्तातरण केले

आज नाईक यांनी आज या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी जागेबद्दल समाधान व्यक्त केले. नाईक म्हणाले ' गेली पाच वर्षे या प्रकल्पसाठी मी प्रयत्न करत होतो. गोवा आणि महाराष्ट्रासाठी एकमेव प्रकल्प आहे. राज्य शासनाने तातडीने पावले उचलून आडाळी येथील ही योग्य जागा प्रकल्पला दिली. त्याबद्दल मी व्यक्तिशः आभारी आहे. या प्रकल्पतून स्थानिकांना चांगला रोजगार मिळेल. जिल्ह्यातील वनौषधी या ठिकाणी गोळा केल्या जातील. त्यावर संशोधन केले जाईल. जागतिक बाजारपेठेत त्याची निर्यात होईल. शेकडो स्थानिकाना रोजगार मिळेल. निश्चितपणे दरडोई उत्पन्न चौपट होईल. जागा आयुष मंत्रालयाच्या ताब्यात आल्यावर लगेच कामाला सुरवात करण्यात येईल. येथील परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. त्याचे रूपानंतर यापुढे रोजगारात होईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: पुढे ढकललेल्या परीक्षा 'या' दिवशी होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री. नाईक यांचा एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष श्रीपाद नाईक, दोडमार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, सुधीर दळवी, प्रवीण गावकर, प्रदीप गावकर, संजय विरनोडकर ग्रामपंचायत सदस्य पराग गांवकर, भाजपा बूथ अध्यक्ष शैलेश दळवी, सुरेंद्र सावंत, संतोष हड्डीकर,ग्रामस्थ शंकर गांवकर, गोविंद परब,एम. एम.गावकर,भगवान गावकर, दत्ताराम गावकर, भिवा गांवकर, जयराम गावकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top