अंबाबाई मंदिरात देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची अनोखी पूजा

Unique worship of temple staff at Ambabai temple
Unique worship of temple staff at Ambabai temple
Updated on

कोल्हापूर ः करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील कर्मचारी म्हटलं की गर्दीमुळे त्यांची रोजची लगबग ठरलेली. लॉकडाउनमुळे मंदिर भाविकांसाठी बंद झाले आणि त्यांची ही लगबग थांबली. पण, ठरलेल्या ड्यूटीवर ही मंडळी रोज हजर. मंदिर परिसराची रोजची स्वच्छता तर ही माणसं करतातच. त्याशिवाय, एरवी कधीच न मिळणारी आरती व इतर धार्मिक विधीतील सहभागाची संधी त्यांना यानिमित्त मिळाली आहे आणि अगदी इमाने-इतबारे या साऱ्या गोष्टी ते करीत आहेत. 
दरम्यान, यंदा कोरोनामुळे मुंबईची संजय मेंटेनन्स कंपनीची टीम मंदिरात आली नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवाची सारी तयारीही हीच मंडळी करीत आहेत. गेला आठवडाभर त्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली असून, उद्या (ता. 12) मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार आहे. 
परिसरात पूर्णपणे शांतता असली तरी देवीचे सर्व नित्य विधी मात्र सुरूच आहेत. मंदिराच्या आवारातील लहान मंदिरांतील नित्य विधीही सुरू ठेवण्यात आले आहेत. मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी परंपरेप्रमाणे पहाटे घंटानाद होऊन नित्य विधीला प्रारंभ होतो. मंदिर बंदचा निर्णय झाल्यापासून फक्त पुजारी व देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश आहे. एकीकडे स्वच्छतेची सेवा सुरू असतानाच एक वेगळाच निवांतपणा त्यांना मंदिर परिसरात अनुभवायला मिळतो आहे. फक्त त्यांच्याच उपस्थितीत आरतीचा एक वेगळाच अनुभवही मिळत असल्याने त्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर हमखास पाहायला मिळते. 


मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी पंधराहून अधिक कर्मचारी मात्र आपापली सेवा चोखपणे देत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रवेश देताना सॅनिटायझेशन, ऑक्‍सिजन तपासणी आदी खबरदारी घेतली जाते. उद्या (ता. 12) मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असून, सकाळपासून रात्री आठपर्यंत ऑनलाईन दर्शनही बंद राहणार आहे. 
- धनाजी जाधव, व्यवस्थापक, अंबाबाई मंदिर 


-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambabai Temple conservation work allegations
Radhanagari Dam Water Level Reaches 85%
Kolhapur auto rickshaw driver murder latest news
Sadabhau Khot Education
Marathi News Esakal
www.esakal.com