कोल्हापूर - ‘आरोग्य विभागाला गरज नसतानाही दोनशेवर शिक्षण संस्थांना तसेच नर्सिंगसारख्या अनेक महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्याचा अभ्यास करीत आहोत,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.