
-नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : आरोग्याशी संबंधित कोणतेही काम असले की आशा स्वयंसेविकांना द्यायचे. मात्र त्याचे मानधन वेळेत द्यायचे नाही किंवा हे कामच दुसऱ्याला द्यायचे, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यांना जानेवारीपासून तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. आयुषमान कार्ड काढण्याचे काम आशांना आणि ते वाटण्याचे काम अंगणवाडी सेविकांना, यामुळे त्याचे मानधनही मिळणार नाही. त्यामुळे ‘कामाला आधी आणि पगाराला कधी कधी’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.