

कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
esakal
Weather Update Maharashtra : ऐन दिवाळी सणानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शहरासह जिल्ह्यात आज जोरदार हजेरी लावली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारनंतर मुसळधार सरी कोसळायला सुरुवात होऊन रात्रीपर्यंत हे चित्र राहिले. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन काढणीला आलेली पिके नुकसानीच्या उंबरठ्यावर आली आहेत, तर शहरातील नागरिक, विक्रेते, वाहनधारकांची तारांबळ उडाली. ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने गैरसोय झालेल्या नागरिकांकडून महापालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला.