esakal | लसीकरणाचा गोंधळ; भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्तांनी धरले धारेवर
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणाचा गोंधळ;  कार्यकर्त्यांनी उपायुक्तांनी  धरले धारेवर

लसीकरणाचा गोंधळ; कार्यकर्त्यांनी उपायुक्तांनी धरले धारेवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील लसीकरणाच्या नियोजनात अपयश आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर भेटी देऊन वस्तुस्थिती तपासली आणि फिरंगाई आरोग्य केंद्रात जाऊन तेथे उपायुक्त निखिल मोरे यांना धारेवर धरत गोंधळाबाबत जाब विचारला. ज्यांचा पहिला डोस होऊन ११० ते ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशांना दिवसांच्या उतरत्या क्रमाने लस देण्यात येतील. अशा स्वरूपाचा संदेश काल महापालिका प्रशासनाकडून दिला होता. त्यात जे नागरिक पात्र आहेत, त्यांना केंद्रातून फोन येईल, त्यानंतरच त्यांनी केंद्रात जावे, असे आवाहन केले होते. परंतु हा संदेश उशिरा आल्यामुळे आणि वृत्तपत्रात सविस्तर माहिती न आल्यामुळे केंद्रांवर नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. त्यातच याद्या काल सायंकाळी मिळाल्या असे सांगून केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पुरेसे फोन केले नाहीत. त्यामुळे ज्यांना लस देणे अपेक्षित होते. ते सोडून अन्य नागरिकांनाच लस दिली. vaccination-center-kolhapur-bjp-party-worker-aggressive-covid-19-update-marathi-news

हेही वाचा- शिक्षणाचे स्वरुप बदलणार; कोल्हापूरातील 100 अंगणवाड्या होणार हायटेक

भाजपचे अजित ठाणेकर, विजय अग्रवाल, विराज चिखलीकर, सुनील पाटील, विशाल शिराळकर यांनी केंद्रांवर भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी तक्रारी खऱ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कार्यकर्ते फिरंगाई केंद्रात आले व तेथे त्यांनी उपायुक्त मोरे यांना बोलवा, अशी मागणी नोडल ऑफिसर प्रशांत पंडत यांच्याकडे केली. ‘उपायुक्त येईपर्यंत केंद्र सोडणार नाही’, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. थोड्या वेळात उपायुक्त आले. त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला व ढिसाळ नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी सहायक आयुक्त औंधकर, केंद्र प्रमुख डॉ. भिसे, रोहन स्वामी, संतोष जोशी आदी उपस्थित होते.

loading image