
CM Devendra Fadanvis : नांदणी (ता. शिरोळ) येथील जिव्हाळ्याच्या बनलेल्या महादेवी हत्तीणप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील खासदार, आमदार यांच्यासह स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक बोलावली. ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. महादेवी हत्तीण ३४ वर्षांपासून नांदणी मठात असून, ती परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. असे फडणवीस म्हणाले यानंतर वनतारा प्रशासनाकडूनही एक आवाहन करण्यात आले आहे. वनतारा प्रशासन सरकारजी भूमिका घेत आहे त्याला आमचा पाठींबा असल्याचे सांगण्यात आले.