esakal | विविध संघटना 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपावर 
sakal

बोलून बातमी शोधा

Various organizations on nationwide strike on 26 November

विविध संघटनांनी या बैठकीत गुरूवारी (ता. 26) होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला

विविध संघटना 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपावर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती व कामगार संघटना कृती समिती यांची शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात नुकतीच बैठक झाली. विविध संघटनांनी या बैठकीत गुरूवारी (ता. 26) होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. असंघटीत कामगार, शासकीय ट्रान्सपोर्ट संघटना, माथाडी कामगार, बांधकाम कामगारांसह आशा कर्मचारीही देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याची माहिती सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिली. 

शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे इरफान अन्सारी, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सी. एम. गायकवाड, शिक्षकेत्तर संघटनेचे एम. व्ही. जाधव, किसान सभेचे उदय नारकर, सीपीआयएमचे शंकर कटाळे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनिअनचे महादेव भोसले, बांधकाम कामगार संघटनेचे शिवाजीराव मगदूम, संदीप सुतार, आशा संघटनेच्या उज्वला पाटील, प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश शिर्के, बॅंक एम्लॉईज युनियनचे प्रकाश जाधव, मेकॅनिकल अँन्ड इंजिनिअर कामगार युनियनचे प्रकाश कांबरे, माध्यमिक शिक्षक संघाचे बाळासाहेब चिंदगे, मार्केट यार्ड हमाल पंचायतचे कृष्णात चौगले, रेल्वे माल धक्का माथाडी कामगारांचे गोरख लेंडवे, लाल बावटा कामगार संघटनेचे भगवान घोरपडे आदि उपस्थित होते. या संपामध्ये किसान सभा, ट्रान्सपोर्ट ऍड डॉक वर्कर्स, किसान सभा, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना, आशा वर्कर्स, बालवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, हमाल पंचायत, माथाडी कामगार, शिरोलीतील मेकॅनिकल ऍड इंजिनिअर कामगार युनिअन संपात सहभागी होणार आहेत. यावेळी सभाध्यक्ष अनिल लवेकर, एस. डी. लाड, सी. एम. गायकवाड, दिलीप पवार, एस. बी. पाटील, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, वसंत डावरे, सुधाकर सावंत, राजेश वरक यांनी मार्गदर्शन केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top