
कोल्हापूर : घरगुती वीज बिल माफ व्हावे, या मागणीकरिता आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या वाहन फेरीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दुचाकी, ट्रक, रिक्षा, ट्रॅव्हल बसमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
कोरोनाच्या संचारबंदीत सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नव्हते. अनेकांचे रोजगार बंद झाले. घरखर्च चालवण्यासाठी त्यांना उसनवारी करावी लागली. वीज बिल भरण्याची त्यांची क्षमता नसल्याने वीज बिल माफ व्हावे, अशी समितीची मागणी आहे. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीचा आहे. सरकारला या प्रश्नी जागे करण्यासाठी समितीने वाहन फेरीचे आयोजन केले. गांधी मैदान येथून फेरीला प्रारंभ झाला.
बिनखांबी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, सीपीआर, दसरा चौक, बिंदू चौक, सायबर चौक, शाहू टोल नाका, तावडे हॉटेल, कावळा नाका, मध्यवर्ती बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा फेरीचा मार्ग राहिला.
हेही वाचा - प्रचारात उतरायचे की घरात बसायचे?
फेरीत कृती समितीचे निवास साळोखे, सुभाष जाधव, विक्रांत पाटील-किणीकर, प्रा. जालंदर पाटील, बाबा इंदुलकर, सुरेश जरग, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, प्रकाश घाटगे, राकेश गायकवाड, अजय अकोळकर सहभागी झाले होते.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.