शाळा सुट्टीचा अखेरचा दिवस; किणी टोल नाक्यावर वाहनांची रांगच रांग

किणी टोल
किणी टोल sakal

घुणकी : विवाह मुहूर्त,शाळांच्या सुट्टीचा अखेरचा दिवस यामुळे पुणे बंगळूर महामार्गावरील किणी पथकर नाक्यावर आज वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत .महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील किणी येथे पथकर वसुलीसाठी पथकर नाका आहे. इथे पुण्याकडे जाण्यासाठी ४ लेन आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी ४ लेन आहेत.फास्टॅग यंत्रणा सुरू झाल्याने वाहने काही मिनीटात पथकर नाक्यावरुन जातात. यामुळे पूर्वी प्रमाणे पथकर देण्यावरून होणारे वाद कमी झाले आहेत.

आज दिपावळीच्या सुट्टीमुळे आणि विवाहाचा मुहूर्त असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झालेली दिसली. प्राथमिक आणि माध्यमिक शाळाना दिपावलीची सुट्टी सुरू आहे. उद्या गुरुवार (ता.११) पासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु होणार आहेत. परगावी सुट्टीसाठी गेलेल्या मुलांना पालक परत आणण्यासाठी गेले आहेत. याशिवाय तिर्थक्षेत्र पाहण्यासाठी गेलेली कुटुंबे आज परत येत आहेत. यामुळे वाहनांची तुडुंब गर्दी झाली आहे.

किणी पथकर नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना उन्हात ताटकळत बसावे लागले. तसेच बहुतांश वेळा फास्टॅगची यंत्रणा स्लो होत होती. विवाह मुहूर्त आणि शाळांच्या सुट्टीमुळे गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

लेन वाढविण्याची गरज

पुण्याकडे जाण्याऱ्या वाहनांसाठी ४ लेन आणि कोल्हापूरकडे जाण्याऱ्या वाहनांसाठी ४ लेन आहेत. वाहनांची कायमस्वरूपी गैरसोय टाळण्यासाठी आणखी किमान दोन दोन लेन वाढविण्याची गरज आहे.

किणी टोल
भूमिपुत्रांमध्ये भांडण लावून एसटी संप मोडण्याचा डाव ; पवारांचा आरोप

विवाह मुहूर्त आणि शाळांचा अखेरचा दिवस असल्याने वाहनांची गर्दी वाढली. वाहन तात्काळ जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

संदेश भोईटे, व्यवस्थापक किणी पथकर नाका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com