इचलकरंजीमध्ये तयार केले केवळ पाच दिवसांत व्हेंटिलेटर 

Ventilators med at Ichalkaranji in five days
Ventilators med at Ichalkaranji in five days
Updated on

इचलकरंजी :  लॉक डाउनमध्ये केवळ पाच दिवसात व्हेंटिलेटर  तयार केला आहे. येथील गणेश  क्वालिटी मशिन्स, मिलिंद बिरादार, सुभाष तंगडी यांनी या मशीनचे डिझाईन बनवून सागर पाटील, विनायक पालकर , शिवानंद बिद्री या सहकाऱ्यांना घेऊन पोलिस परवानगीने घेऊन  उत्पादन केले.
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांनी पुढे येऊन व्हेंटिलेटर व इतर मेडिकल साहित्य बनवण्यास पुढे यावे असे आवाहन केले आहे. या आवाहनाला इचलकंजीतील उद्योजक आणि डॉक्टरांनी साथ दिली आहे.

सोशल डीस्तांसिंग पाळत, फोन वरून चर्चा करत अवघ्या बारा दिवसात व्हेंटिलेटरचा प्रोटो टाईप बनवला. 

इचकरंजी येथील जयदीप मोघे, सुभाष तंगडी,  मिलिंद बिरादार,   संतोष साधले यांनी लॉकडाॅमध्ये व्हेंटिलेटर कसा डेव्हलप करता येईल याचा अभ्यास केला. 

वैद्यकीय तज्ञांचा सल्ला
 शासनाच्या निकषानुसार त्यामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात या प्रमाणे काही डिझाइन्स बनवले. त्यामध्ये डॉ. सत्यनारायण वड्डीन, डॉ. केतकी साखरपे यांनी वैद्यकीय दृष्ट्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ही महत्वाची माहिती दिली.
पेशंटला देण्यात येणाऱ्या हवेचे प्रमाण,वेग आणि प्रेशरचा मेळ घालणे हा या मशीन डेव्हलपमेंटचा गाभा आहे. मशीनचा मेकॅनिकल विभाग मिलिंद बिरादार व संतोष साधले यांनी पहिला. 
इलेक्ट्रॉनिक्सचा विभाग सुभाष तंगडी आणि प्रोफेसर धनश्री बिरादार यांनी पहिला. 

सहज वापरणे शक्य

या व्हेंटिलेटरची महत्वाची वेशिष्टये म्हणजे व्हेंटिलेटरमध्ये हवेचे प्रमाण बदलण्याची सोय, श्वसनाचा वेग आणि प्रेशर नियंत्रित करण्याची क्षमता, फ्रेश हवेमध्ये ऑक्सिजन वाढवण्याचे प्रमाण बदलू शकणे ही आहेत. व्हेंटिलेटरचे वजन फक्त १२ किलो असून हे सहज कुठेही घेऊन जाण्यासारखे आहे. हा व्हेंटिलेटर जनरल वॉर्ड आणि अँब्युलन्स मध्ये सहजपणे वापरता येईल. 
हे मशीन सहज परवडण्यासारख्या किंमतीमुळे बऱ्याच लोकांना उपयोगी पडू शकेल. इचलकरंजी करांच्या या उपक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी निवासजी घाडगे, आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन नेहमीच मिळत राहिले. पुढच्या टप्यामध्ये शासनाकडून याच्या उत्पादनासाठी मान्यता मिळवणे आणि व्हेंटिलेटर मधील सोयी वाढवण्यावर टीमचे काम सुरू आहे.

हे आहेत शिल्पकार

इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच बनवलेल्या या व्हेंटिलेटर बद्दल जयदीप मोघे, डी. एम. बिरादार, सुभाष तंगडी, मिलिंद बिरादार, डॉ सत्यनारायण वड्डीन, डॉ. केतकी साखरपे, संतोष साधले, राहुल धोंडपुडे, धनश्री बिरादार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com