
कुडित्रे : भामटे (ता. करवीर) येथे माळीनसारखे संकट ओढवले आहे. ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनसाठी खोदाई केल्याने मुरूम हलविल्यामुळे डोंगरावरील मुरुम ठिसूळ बनला होता. आज अतिवृष्टी झाली, यावेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगर कोसळला आणि एका घरात गाळ शिरला. दरम्यान, या डोंगरामुळे संपूर्ण प्रतापगड गल्ली भीतीच्या छायेखाली आहे.