
Gunshots In Kolhapur : किरकोळ वादातून सुरुवात झालेल्या भांडणाचा शेवट थेट गोळीबारात झाल्याने टोप व शिरोली परिसरात खळबळ उडाली. एका बँकेसमोर झालेल्या या घटनेत प्रसंगावधान दाखवत जमावातील एका तरुणाने संशयिताचा हात वर केला. त्यामुळे तीन गोळ्या हवेत झाडल्या गेल्या आणि एकाचा जीव थोडक्यात वाचला. गोळीबारानंतर आरोपीने स्वतः शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.