पन्हाळा : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (Kolhapur-Ratnagiri Highway) पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघबीळ घाटातील (Waghbil Ghat) चौकात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. दुकानांसमोर लावलेल्या वाहनांची व चहाच्या टपरीवरील साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.