Police Say No Festivals on Fort : विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरूस साजरे करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानंतर अनेकांनी या निर्णयावर आक्षेप घेतला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाविरोधात आता जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही, असेही पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.