कोल्हापूर : वाघापूर (ता. भुदरगड) येथे कमान उभारून त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. .आज गावातील दोन्ही बाजूंच्या लोकांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत बैठक झाली; परंतु चर्चा निष्फळ ठरून मार्ग न निघाल्याने सायंकाळी आंदोलक लाँगमार्चद्वारे मंत्रालय, मुंबईकडे रवाना झाले. आज रात्री त्यांचा मुक्काम टोप-संभापूर (ता. हातकणंगले) येथे राहिला..Kolhapur Football Training : कोल्हापुरच्या फुटबॉलपटूंना मोठा दिलासा; निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीचा मार्ग अखेर मोकळा.वाघापूरच्या कमानीबाबत आंबेडकरी संघटनांनी काल, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी येडगे यांच्यासोबत बैठक होऊनही निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आंदोलनस्थळीच कडाक्याच्या थंडीत मुक्काम केला. आज पुन्हा दिवसभर आंदोलन सुरू राहिले. यावेळी आंदोलकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला..आज पुन्हा दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी यांच्यासमवेत गावातील प्रमुख कार्यकर्ते व आंदोलक अशा दोन्ही बाजूंची बैठक झाली. यावेळी पहिल्यांदा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर दोन कमानी उभ्या करून सर्व महापुरुषांची नावे देण्याबाबतही चर्चा झाली; परंतु कमान पुढे की मागे, याबाबत कोणतेही एकमत होऊ शकले नाही. .Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर.त्यामुळे सायंकाळी सहापर्यंत तब्बल दोन तास चाललेली ही बैठक अखेर निष्फळ ठरली. त्यामुळे सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महावीर कॉलेज, कसबा बावडामार्गे थेट मंत्रायलयाच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला. रात्री हे आंदोलक टोप-संभापूर येथे मुक्कामाला थांबले. सकाळी पुन्हा ते मंत्रालयाकडे रवाना होणार आहेत. .आंदोलनात आरपीआय (ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, सदानंद हिंगे, अविनाश कांबळे, बबन कांबळे, अशोक कांबळे, सातापा कांबळे, नेताजी कांबळे, नामदेव कांबळे, सागर कांबळे आदी सहभागी झाले होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.