esakal | वाघोत्रे परिसरात तो ठरतोय शेतकऱ्यांचा कर्दनकाळ
sakal

बोलून बातमी शोधा

 In Waghotre area, it is becoming a time of hardship for farmers

वाघोत्रे (ता. चंदगड) परिसरात तीन हत्तींनी माजी सरपंच मारुती गावडे यांच्या अर्ध्या एकरातील ऊस, दीड एकरातील भात, केळी, फणस, सुपारीची झाडे भुईसपाट केली. भात पोटरीला येत असताना हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

वाघोत्रे परिसरात तो ठरतोय शेतकऱ्यांचा कर्दनकाळ

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड ः वाघोत्रे (ता. चंदगड) परिसरात तीन हत्तींनी माजी सरपंच मारुती गावडे यांच्या अर्ध्या एकरातील ऊस, दीड एकरातील भात, केळी, फणस, सुपारीची झाडे भुईसपाट केली. भात पोटरीला येत असताना हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात याच भागात हत्ती दाखल झाला होता. त्या वेळीही गावडे यांच्या उसाचे नुकसान केले होते. पंधरा दिवसांत पुन्हा तीन हत्ती दाखल झाले असून त्यांच्याकडून नुकसान होत आहे. गावडे यांच्या गोबरगॅसजवळून जाताना शेणाच्या टाकीचेही नुकसान झाले आहे. हत्तीच्या पावलाचे ठसे उमटले असून भात पिकातून जाताना पिकाचा चिखल झाला आहे. हत्तींकडून होणारे जाणारे नुकसान पाहून त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहत आहेत. वन विभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच संतोष गावडे, उपसरपंच अजय कातकर यांनी दिला आहे. कोल्हापूर कोल्हापूर 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

loading image
go to top