
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (केडीसीसी) वारणा शाखेतील अपहार प्रकरणातील पाच जणांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. त्यांनी नोकरी कालावधीत खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांची माहिती जिल्हा उपनिबंधकांकडून मागविली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.