
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : शहरे आणि गावांत सांडपाणी मोठ्या प्रमाणात तयार होते. त्यात प्रदूषकांबरोबरच निसर्गाला आणि मानवी शरीराला घातक असणारे अनेक घटक असतात. हे सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये सोडले जाते. त्यामुळे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. हे असेच सुरू राहिले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.