esakal | इचलकरंजीत पाणीबाणी: ऐन उन्हाळ्यात वेळापत्रक विस्कळीत;  कृष्णा योजनेला गळती तर 'पंचगंगा' उपसा बंद

बोलून बातमी शोधा

water supply schedule will be disrupted again this summer ichalkaranji marathi news

इचलकरंजीला कृष्णा नदीतून दररोज 30 एमएलडी तर पंचगंगा नदीतून 9 एमएलडी इतका पाणी पुरवठा केला जातो.

इचलकरंजीत पाणीबाणी: ऐन उन्हाळ्यात वेळापत्रक विस्कळीत;  कृष्णा योजनेला गळती तर 'पंचगंगा' उपसा बंद
sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) :  ऐन उन्हाळ्यात पून्हा शहरात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. पंचगंगा नदीतून पाणी उपसा पूर्णतः बंद पडला आहे. त्यामुळे दररोज 9 एमएलडी इतक्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. तर गळतीमुळे कृष्णा नदीतून मिळणारे पाणीही अपुरे उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांना पुढील कांही दिवस वेळी - अवेळी पाणी मिळणार आहे.

इचलकरंजीला कृष्णा नदीतून दररोज 30 एमएलडी तर पंचगंगा नदीतून 9 एमएलडी इतका पाणी पुरवठा केला जातो. कांही भगात एक दिवस आड, कांही भागात दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र गळतीमुळे सातत्याने ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे. कांही दिवसांपूर्वी पाण्यासाठी शहरातील विविध भागात आंदोलनेही झाली होती. आता कुठे पाणी पुरवठा सुरळीत होत असतांना पून्हा संकट निर्माण झाले आहे.

हेही वाचा- कोरोनाची धास्ती घेतलेल्या परीक्षार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला  धरला जोर

कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला शिरढोण येथील पंचगंगा नदीत तब्बल सहा ठिकाणी गळती लागली आहे. त्यातून मोठया प्रमाणात पाणी वाया जात आहे. नदीपात्रात असल्यांने गळती काढण्यास अडचणी येत आहेत. सुदैवाने पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे गळती काढणे शक्य असल्यांने यंत्रणा कामाला लागली आहे. उद्या (शुक्रवार) गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कांही काळ कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद राहणार आहे.

दुसरीकडे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाणी प्रदुषीत होत चालले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पंचगंगा नदीतून गेल्या चार दिवसांपासून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. या नदीतून दररोज उपलब्ध होणारे 9 एमएलडी इतका पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे गरजेपेक्षा कमी पाणी उपलब्ध होत आहे. परिणामी पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार असून नागरिकांना वेळी-अवेळी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लगाणार आहे.

“खबरदारी म्हणून पंचगंगा नदीतील पाणी उपसा बंद केला आहे. त्यामुळे कमी पाणीसाठा उपलब्ध होत आहे. कृष्णा योजनेच्या जलवाहिनीची गळती काढण्यात येणार आहे. परिणामी, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.“
सुभाष देशपांडे, जल अभियंता,इचलकरंजी नगरपरिषद

संपादन- अर्चना बनगे