
सुनील पाटील
कोल्हापूर : राज्यातील आणि जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना महावितरणकडून दिला जाणारा सवलतीचा दर बंद केला आहे. या संस्थांच्या वीज पंपाचे बिलात तीन ते चार पटीने वाढ होणार आहे. त्यामुळे गोरगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आधारवड असणाऱ्या राज्यातील सुमारे दोन हजार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ६४७ या पाणीपुरवठा संस्था मोडीत निघणार आहेत.